काजू उत्पादकांच्या आंदोलनास सावंतवाडी दोडामार्गसह कणकवलीत उस्फूर्त प्रतिसाद : काजूस हमीभाव द्या शासनाकडे मागणी

कणकवली तालुक्यातील काजू उत्पादकांच्या काजू हमीभाव मिळावा यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनानंतर कणकवली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी साहेब. कृषिमंत्री केंद्र सरकार नवी दिल्ली तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित रावजी पवार, कृषिमंत्री धनंजय जी मुंडे साहेब यांना काजूसाठी हमीभाव दोनशे रुपये प्रति दर किलो निवेदन देण्यात आले तसेच आयात मालावर 20 टक्के आयात शुल्क लावण्यात यावे आणि जीआय मानांकित कोकण विभागामध्ये आयात काजूला प्रक्रिया करणे आणि विक्री करण्याला बंदी करण्यात यावी अशीही मागणी यावेळेस करण्यात आली. अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्याला योग्य त्या पद्धतीने दोनशे रुपये प्रति किलो हमीभाव मिळावा अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. आज रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा येथे सर्व तहसीलदार कार्यालय समोर धरणे आंदोलन व निवेदन देण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून कणकवली येथे झालेल्या या आंदोलनात श्री हेमंत सावंत अध्यक्ष स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघ, गोपुरी काजू समूहाचे श्री विनायक उर्फ बाळू मिस्त्री, श्री आदर्श मोरस्कर, सामाचे प्रतिनिधी श्री पंकजराव दळी, वाघेरी गावचे प्रतिष्ठित शेतकरी महेंद्र रावराणे, सातरल येथील काजू बागायतदार आणि प्रक्रियादार श्री बाबू राणे, हरकुळ बुद्रुक येथील शेतकरी श्री निखिल भोगटे असरोंडी तालुका मालवण येथील उपसरपंच श्री आदित्य सावंत आणि प्रमोद सावंत कृषी पदवीधर उद्योजक श्री शेखर सावंत आणि सिंधुदुर्ग जिल्हा फळबागायतदार संघटनेचे श्री व्ही के सावंत उपस्थित होते.
कणकवली (सीतराज परब)





