गोंधळी समाज प्रीमियर लीगच्या क्रिकेट स्पर्धेचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते उद्घाटन

गेली 17 वर्षे सातत्याने भरविण्यात येत आहेत स्पर्धा
जय भवानी मित्र मंडळ आयोजित गोंधळी समाज प्रीमियर लीग च्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते हुबरट या ठिकाणी करण्यात आले. या स्पर्धेचे हे 17 वे वर्ष असून या उद्घाटन प्रसंगी कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. गोंधळी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धा म्हणजे खेळाडू निर्माण करण्यासाठी चे व्यासपीठ असल्याचे उद्गार श्री नलावडे यांनी काढले. यावेळी हनुमंत इंगळे, मलाप्पा इंगळे, विजय इंगळे आदी उपस्थित होते.
कणकवली/ प्रतिनिधी