विधानसभेत विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्यांवरुन आक्रमक

राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मुद्यांवरुन विरोधी पक्ष विधिमंडळाच्या आवारात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. महाविकास आघाडीद्वारे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विधानभवन परिसरात आंदोलन करण्यात आलं. नेत्यांनी गळ्यात संत्री, वांगी याची माळ घालून आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाझर, सरकार दाखवतंय गाजर, शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार चारसो बीस,विमा कंपन्या झाल्या मालामाल, शेतकरी झाला कंगाल अशा घोषणा विरोधकांनी केल्या आहेत.विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, सुनील प्रभू , नाना पटोले, अनिल देशमुख, अभिजित वंजारी, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात, रवींद्र धंगेकर, अशोक चव्हाण आदींद्वारे विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात येत आहे.शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, पीकविमा मिळावा यासाठी विरोधी पक्षाकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं.
ब्युरो न्यूज सिंधुदुर्ग




