घोडावत विद्यापीठातील फार्मसीच्या विद्यार्थ्याला ३८.४३ लाखाचे पॅकेज

अतिग्रे : संजय घोडावत विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस’ मधील विद्यार्थी पराग भोपाळे याला लक्झेंबर्गमधील नामांकित ‘फार्मासी हॅमिलुअस’ येथे नोकरीची संधी मिळाली आहे. त्याला वार्षिक ३८.४३ लाख रुपयाचे पॅकेज प्राप्त झाले आहे. फार्मसी विभागातील आतापर्यंतचे हे सर्वोच्च पॅकेज आहे.








