सहवेदना श्रीमती इंदिरादेवी साहेबराव भोसले-इनामदार

आचरा : आचरा येथील रहिवाशी श्रीमती इंदिरादेवी साहेबराव भोसले-इनामदार(80) यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, पुतणे, सुना नातवंडे असा परिवार आहे. रिक्षा व्यावसायिक माधवराव भोसले-इनामदार यांच्या त्या आई होत. डॉ राजेश भोसले-इनामदार यांच्या त्या काकी होत. आचरा प्रतिनिधी

नांदगाव ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष्मीकांत मोरजकर हृदयविकाराच्या झटक्याने निधन

नांदगाव ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष्मीकांत सुधाकर मोरजकर(३९, रा नांदगाव मोरयेवाडी) यांचा शुक्रवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, लक्ष्मीकांत मोरोजकर सकाळी घरी असताना त्यांना अचानक उलटी आली.त्यानंतर ते आंघोळीला गेले असताना चक्कर येऊ…

गटातटाचे राजकारण करून काहीजण देवस्थाने बंद करू पाहत आहेत!

खासदार विनायक राऊत यांची जोरदार टीका शिवसेना खा. अरविंद सावंत यांच्याकडून नाटळ, हरकुळ-बुद्रुक विभागाच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण सिंधुदुर्गात आरोग्य आणि शिक्षण यावर सर्वाधिक लक्ष देणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊनच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या जिल्हयासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…

सरपंचांनी गाव आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करावेत!

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली मतदारसंघातील सरपंचांना प्रशिक्षण आत्मनिर्भर भारत होण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच हा महत्त्वाचा दुवा आहे. त्यासाठीच भाजपचे कणकवली, देवगड ,वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांनी या सरपंचांना ग्रामविकासाचा कारभार कसा करावा याचे प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम सुरू…

चर्मकार समाज भवनासाठी अजून 10 लाख रुपयांचा निधी

आमदार वैभव नाईक यांची कणकवलीत घोषणा पुढील वर्षी संत रविदास जयंती समाज भावनात साजरी करू! : समीर नलावडे संत शिरोमणी रविदास महाराज यांची आज संपूर्ण जिल्ह्यातील समाज बांधवांनी एकत्र येत ६४५ वी जयंती कार्यक्रम कणकवली येथे आयोजित करण्यात आला होता.…

सरपंचांनी गाव आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करावेत!

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली मतदारसंघातील सरपंचांना प्रशिक्षण कणकवली : आत्मनिर्भर भारत होण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच हा महत्त्वाचा दुवा आहे. त्यासाठीच भाजपचे कणकवली, देवगड ,वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांनी या सरपंचांना ग्रामविकासाचा कारभार कसा करावा याचे प्रशिक्षण देण्याचा अभिनव…

श्री देव भैरव जोगेश्वरी मंदिर-कुडाळ-भैरववाडी येथे वर्धापन दिन सोहळा

दशावतार नाट्य, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी कुडाळ : श्री देव भैरव उत्सव मंडळ, कुडाळ (भैरववाडी) यांच्यातर्फे वर्धापन दिन सोहळा सन २०२३ सोमवार, ६ फेब्रुवारी २०२३ ते ८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत संपन्न होणार आहे. यानिमित्त आज, सोमवार ६ फेब्रुवारी सायंकाळी ७…

जिल्हास्तरीय उड्डाण महोत्सवात खारेपाटण महाविद्यालयाचे घवघवीत यश

खारेपाटण: कणकवली महाविद्यालय येथे आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ३ फेब्रुवारी उड्डाण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या हेतूने सांस्कृतिक विभागाच्या युवा…

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आंबडोस येथे स्वच्छता अभियान

मालवण : महाराष्ट्र भूषण डॉ . श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, तालुका-अलिबाग, जिल्हा-रायगड यांच्या सौजन्याने महाराष्ट्र भूषण आ. ति . डॉ . श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज आंबडोस स्मशानभूमी व दुतर्फा रस्ता स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छ्ता…

भजन स्पर्धेमध्ये निरवडे येथील बुवा गौरी पारकरची बाजी

सावंतवाडी : महाराष्ट्र कामगार कल्याण यांच्या विद्यमाने नुकत्याच २९ आणि ३० जानेवारी २०२३ रोजी झालेल्या राज्यस्तरीय भजन स्पर्धेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या १३ व्या भजन स्पर्धेमध्ये सावंतवाडीची बुवा तथा निरवडे गावची गौरी बाबू पारकर हिने पुन्हा एकदा आपली योग्यता सिद्ध केली.…

error: Content is protected !!