कांदळगाव येथील नृत्य स्पर्धेत मृणाल सावंतला प्रथम क्रमांक

प्रतिनिधी । कुडाळ : सिद्धार्थ विकास मंडळ आणि यशोधरा महिला मंडळ कांदळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंत्युस्तव कार्यक्रमामध्ये (बुद्दीष्ठ फेस्टिव्हल) मध्ये चुरशीच्या खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत पिंगुळी-कुडाळ येथील मृणाल अजय सावंत हिने प्रथम क्रमांक मिळवला .
प्रथम क्रमांकासाठी मृणाल हिला रोख 7 हजार 132 रु व चषक संदीप लहू कदम यांजकडून संजय भगवान कदम व गितेश लहु कदम यांच्या स्मरणार्थ देण्यात आले. रेकॉर्ड डान्स स्पर्धेतील सर्व आकर्षक चषक वैशाली गंगाराम कदम / गायकवाड यांच्याकडून अजय गंगाराम कदम यांच्या स्मरणार्थ देण्यात आले. द्वितिय क्रमांकाचे बक्षिस समर्थ गवंडी (रेडी) यांना रोख 5 हजार 132 रु व चषक गंगाधर भिमराव कदम यांजकडून आईवडीलांच्या स्मरणार्थ देण्यात आले, तर तृतीय क्रमांकाचे बक्षिस नेहा जाधव (कुडाळ) यांना रोख 3 हजार 132 रु व चषक निमिष नारायण कदम यांजकडुन त्यांचे वडील नारायण विठोबा कदम व निलेश कदम यांच्या स्मरणार्थ देण्यात आले. स्पर्धेतील उत्तेजनार्थ पारितोषिक विश्लेषा मंडलिक (मालवण) हिला रोख 1 हजार 632 रु व चषक सन्मय व विराजस उदय कदम यांजकडून देण्यात आले. दुसरे उत्तेजणार्थ बक्षीस पुर्वा मेस्त्री हिने मिळवले. तिला रोख 1 हजार 632 रु व चषक नितिन कल्याण कदम यांजकडून देण्यात आले .
स्पर्धेचे परीक्षक म्हणुन सिध्देश पालव आणि यशश्री वरक यांनी काम पाहिले. रेकॉर्ड डान्स बक्षिस वितरण समारंभास सिद्धार्थ विकास मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ कदम, समाजभुषण संदीप कदम, विद्याधर कदम, कल्याण कदम, लहु कदम, नितिन कदम, माजी अध्यक्ष गंगाधर कदम, विकास कदम, संदेश कदम , अभिमन्यु कदम, निमिष कदम, उदय कदम, प्रमोद कदम, कांचनमाला कदम, अनघा कदम, वैभव कदम, निलिमा कदम , मुंबई मंडळाचे अध्यक्ष राजेश कदम उपस्थित होते.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!