नाधवडे येथील नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत विजेती

प्रतिनिधी । कुडाळ : वैभववाडी तालुक्यातील नाधवडे (चारवाडी) येथील खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत पिगुळी कुडाळची मृणाल सावंत विजेती ठरली. गुरव – पावसकरवाडी विकास मंडळ, नाधवडे मुंबई व स्थानिक ग्रामस्थ यांच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धासह हळदी-कुंकू समारंभ स्थानिक भजने आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
एकेरी नृत्य स्पर्धेत द्वितीय स्वराली खानोलकर सावंतवाडी, तृतीय नेहा जाधव इन्सुली यांनी मिळविला. स्पर्धेचे परीक्षण सुधीर नकाशे, सौ विशाखा शिंदे व संजय कदम यांनी केले. वीस स्पर्धकानी सहभाग घेतला होता. यावेळी माजी जि प सदस्य संजय नकाशे, माजी सरपंच साक्षी कदम, रोहित पावस्कर, शंकर लाड, प्रकाश गुरव, रमेश गुरव, सुनील गुरव, अनिकेत गुरव, प्रमोद पांचाळ तसेच गुरव – पावसकर वाडी विकास मंडळ, नाधवडे मुंबई व स्थानिक ग्रामस्थ पदाधिकारी आदी उपस्थित होते. विजेत्यांना रोख रक्कम रु पाच हजार, रु तीन हजार, रु दोन हजार व भव्य चषक तसेच सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. निवेदन प्रमोद पांचाळ यांनी केले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!