पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर कणकवली आचरा रोडवरील खड्डे एका रात्रीत बुजवले!

कणकवली शहरातील तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांचे खड्डे, गणेश चतुर्थी पूर्वी बुजवण्याच्या पालकमंत्री यांच्या सूचना

पालकमंत्र्यांच्या “क्विक ऍक्शन” च्या आदेशामुळे नागरिकांमधून समाधान

कणकवली शहरातील नगरपंचायत हद्दीतील,
अप्पासाहेब पटवर्धन चौक ते अचरा कडे जाणारा रस्ता , नगरपंचायत व जिल्हा परिषद हद्दीतील , रस्त्याचे खड्डे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर रविवारी रात्री उशिरा बुजवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तात्काळ करण्यात आले. या रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच खड्ड्यांमुळे वाहतुकीला सुद्धा अडथळे निर्माण होत होते. येणाऱ्या गणेशोत्सवाच्या सणाची वर्दळ विचारात घेता व रस्त्याची परिस्थिती पाहता पालकमंत्र्यांनी याबाबत तात्काळ कार्यवाहीच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या होत्या. त्यानंतर रविवारी रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे खड्डे बुजून हा रस्ता वाहतुकीस योग्य करण्यात आला आहे. याबद्दल कणकवली शहरवासीयांमधून पालकमंत्री नितेश राणे यांच्या या तात्काळ उपाय योजनेबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान कणकवली तालुक्यातील व विभागातील अन्य रस्त्यांचे देखील खड्डे बुजवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!