हुमरमळा-गाळवणीवाडी येथील विद्यार्थ्यांनीची गळफास घेत आत्महत्या

तालुक्यातील हुमरमळा गाळवणीवाडी येथील रहिवासी व पाट हायस्कूल मध्ये नववी इयत्तेत शिकत असलेल्या,कु.युगा उमेश कानडे ( वय १५) या शालेय विद्यार्थ्यांनीने रविवारी (९ ऑगस्ट) सकाळी सुमारे ११ च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. कु.युगा ही पाट हायस्कूल मध्ये नववीच्या वर्गात शिकत होती. मात्र,या आत्महत्येचे नेमक कारण समजू शकले नाही.
या घटने बाबत निवती पोलिस स्टेशनमध्ये हुमरमळा पोलिस पाटील सुबोध सावंत यांनी कळविले. त्यांनंतर पंचनामा करून तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. रविवारी सायंकाळी तिच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. युगाच्या आत्महत्येमुळे तिच्या पालकांना व नातेवाईकांना धक्का बसला आहे. हुमरमळा येथील गवंडी काम करणारे उमेश कानडे यांची ती एकुलती एक कन्या होती. गाळवणीवाडी येथील अंतिम संस्कारावेळी सर्वच स्तरातील लोक उपस्थित होते. हुमरमळा तिठ्ठा येथील दुकाने बंद ठेवून तिला श्रध्दांजली वाहण्यात आली. पुढील तपास निवती पोलिस करत आहेत.






