भूमिगत विद्यूत लाईन मुळे रस्ता साईडपट्टी धोकादायक

महावितरणकडून आचरा देवूळवाडी कडे जाणा-या रस्त्याच्या साईडलाच खोदून भूमिगत विद्यूत लाईन टाकली होती. रविवारी पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठीकाणी ही साईडपट्टी वाहून गेली तर काही ठिकाणी ही साईडपट्टी खचून गेली आहे. रस्त्यावरही माती आली आहे. त्यामुळे वाहतूकीस धोकादायक बनली आहे. सध्या पर्यटन हंगामामुळे रामेश्वर दर्शनासाठी वाहनांची वर्दळ वाढली आहे. यामुळे साईड देताना भूमिगत लाईन टाकलेल्या बाजूला वाहन घातल्यास रुतून बसण्याची नाहितर कलंडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे तातडीने रस्ता साईडपट्टी सुस्थितीत करण्याची मागणी होत आहे.

error: Content is protected !!