बांधकाम कामगार संघटित झाला पाहिजे !

बाबल नांदोसकर यांचे प्रतिपादन

नेरूर मध्ये कामगारांसोबत सहविचार सभा

निलेश जोशी । कुडाळ : बांधकाम कामगार संघटीत झाला पाहिजे. शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत. यासाठीच आम्ही तळागाळातील कामगारांपर्यंत पोचून त्यांना संघटीत करण्यासाठी काम करत आहोत, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा  बांधकाम कल्याणकारी संघाचे अध्यक्ष बाबल नांदोस्कर यानी नेरूर येथे केले.
    कामगार कल्याण संघ सिंधुदुर्ग या संघटनेच्या माध्यमातून  नेरूर ग्रामपंचायत येथे कामगार यांच्यासोबत  सहविचार सभा झाली. यावेळी मध्यान्ह भोजन, कामगार योजन नोंदणी, नूतनी करण शिष्यवृती इतर लाभाचे योजना हत्यार खरेदी, सुरक्षा संच घरकुल योजना पेन्शन योजना यासाठी संघटना प्रयत्न करत आहे. याविषयावर चर्चा झाली.
यावेळी नेरूर गावचे सरपंच भक्ती घाडी, संघटना पदाधिकारी  सचिव रविंद्र साळकर, सदस्यअनिल कदम, बहुसंख्येने कामगार वर्ग उपस्थित होता. यावेळी बोलताना नांदोसकर म्हणाले, शासन दरबारी आपले अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडविण्यासाठी सर्वप्रथम सर्वजण एका छत्राखाली आले पाहिजेत. संघटित झाले पाहिजेत. अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी आपण जागे झाले पाहिजे, असे सांगत कामगार यांना मिळणाऱ्या योजनांसंदर्भातील अन्यायकारक नियम व अर्ज मंजुरीची क्लिष्ट पद्धतबाबत माहिती दिली. बांधकाम कामगार संघटित व्हावे त्यांचे विविध प्रश्न मेळाव्याच्या माध्यमातून सुटण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील.   यावेळी मध्यान्ह भोजन, कामगार योजना नोंदणी, नृतनीकरण शिष्यवृती इतर लाभाचे योजना हत्यार खरेदी, सुरक्षा संच घरकुल योजना पेन्शन योजना यासाठी संघटना प्रयत्न करत आहे. याविषयावर चर्चा झाली.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!