हायवे प्रशासन सुस्थ नागरिक त्रस्थ

केव्हा येणार जाग या सुस्थ प्रशासनाला
श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर सामाजिक कार्यकर्ते यांचा सवाल
मुंबई गोवा हायवे चे काम पूर्ण झाल्या च्या कल्पनेने, हायवे चे काम घेतलेल्या ठेकेदारांना वाटले असेल आपले काम संपले. पण ज्या मुलभूत सुविधा सामान्य नागरिकांना मिळायला पाहिजे, त्या कुठे आहेत, आणि नाही मिळाल्या, याचे कारण काय आणि
आज कणकवली मध्ये अप्पासाहेब पटवर्धन चौक ते दोन्ही बाजूंना, म्हणजे गड नदी ते जाणवली नदीच्या पर्यंत उड्डाण पुलाच्या खाली जी अस्वच्छता आहे, हि तसेच पुलाच्या बाजुने जो रस्ता गाड्यांना ये जा करण्यासाठी तो काही ठिकाणी अरुंद
रस्त्यावर चालताना सामान्य माणसाला चालण्यासाठी जी फुट़पाध ठेवली आहे, ती आणि कशासाठी, दुकानांचे बोर्ड लावण्यासाठी फुटपाथवर वयस्कर माणसांनी चालायचे कसे, जागाच नाही तर चालणार कसे
फुटपाथ च्या बाजूला जी वाहने तासंतास पार्कींग करून ठेवलेली असतात ती, सर्व सामान्य नागरिक हाच प्रश्र्न विचारतोय, अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे आल्यावर, कोणी त्यांच्या या समस्येवर विचार करणार, आहे की नाही
ना पार्किंग ची व्यवस्था ना, बाहेरील खरेदी साठी कणकवली मध्ये येणाऱ्यांसाठी सुलभ शौचालयाची व्यवस्था, हायवे प्रशासना कडून या सर्व सोयी सुविधा करून घेणार कोण, कोणाची जबाबदारी आहे , ही आज अर्धवट तोडलेल्या घरां मुळे, काय अवस्था झाली आहे, कणकवली ची याचा विचार कोण करणार आहे की नाही.
तरी वेळी च या सर्व बाबींचा विचार केला जावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री पेडणेकर यांनी विनंती वजा केली आहे.





