मंत्रालयात शिवराज्याभिषेक सोहळा नियोजन बैठक

प्रतिनिधी । कुडाळ : श्री शिवछत्रपतींच्या ३५० व्या शिवराज्यभिषेक सोहळ्याबाबत नियोजनाची बैठक मंत्रालयात सांस्कृतिक मंत्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात पार पडली. यावेळी सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक व निर्माते नितीन देसाई यांनी यासंदर्भात सादरीकरण केले. २ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त करावयाच्या व्यवस्थेबाबत या बैठकीत विस्तृत चर्चा झाली.
यावेळी या कार्यक्रमसंदर्भात आवश्यक त्या सूचना उपस्थितांना दिल्या. यावेळी आमदार भरतशेठ गोगावले, महेंद्र थोरवे, गोपीचंद पडळकर, कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडचे अध्यक्ष सुनील पवार व समितीचे पदाधिकारी समीर वारेकर, सुधीर थोरात, सुनील कदम, पंकज भोसले, राजू देसाई, महेश परब, आशिष कदम , रुपेश मोरे व इतर सदस्य उपस्थित होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.