सांगवे मध्ये भरणार सिंधुदुर्गातील पहिला मिरग महोत्सव

शेती औजारे, गावठी बाजारासह मालवणी मेजवानीची देखील पर्वणी

भिरवंडे सोसायटीच्या वतीने आयोजन

कणकवली तालुक्यातील भिरवंडे विविध कार्यकारी सेवा सोसायटी च्या वतीने मिरग महोत्सव 2023 चे आयोजन शनिवार 13 व रविवार 14 मे रोजी करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन 13 मे रोजी सकाळी 8 वाजता समाधी पुरुष हॉल सांगवे कनेडी बाजार या ठिकाणी होणार आहे. कोकणात मिरगाच्या बाजाराला मोठे महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळाव्यात या उद्देशाने या मिरग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत हा महोत्सव चालणार आहे. यामध्ये गावठी बाजार, मालवणी मेजवानी, आधुनिक शेती औजारे व प्रदर्शन, रोपवाटिका, भात बियाणे या सगळ्यांची एकाच ठिकाणी खरेदी करता येणार आहे. आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार असून, शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत हे यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असणार आहेत. यावेळी सांगवे सरपंच संजय उर्फ बाबू सावंत, भिरवंडे सरपंच नितीन सावंत, गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे आदि उपस्थित राहणार आहे. यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन भीरवंडे विविध कार्यकारी संस्थेचे संचालक मंडळ, शेतकरी सभासद व चेअरमन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!