क्रांती दिनानिमित्त हुतात्मा कोयंडे स्मारक येथे महसूल कडून मानवंदना

क्रांती दिना निमित्ताने आचरा ता.मालवण येथील हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे स्मारक येथे महसूल प्रशासनाकडून आचरा मंडल अधिकारी उमेश सिंघनाथ, तसेच आचरा सरपंच जेरान फर्नांडीस यांनी पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना दिली. यावेळी उपसरपंच संतोष मिराशी,ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर,कोतवाल गिरीश घाडी मनिष चव्हाण यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते. यावेळी हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे यांच्या प्रतिमेसही मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.






