तोंडवळी वाघेश्वर मंदिर येथे १७ रोजी दिंडी नृत्य भजन स्पर्धा

तोंडवळी येथील श्री देव वाघेश्वर मंदिर येथे पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त श्री देव वाघेश्वर भक्त मंडळ यांच्या तर्फे सोमवार १७ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता देखावा युक्त दिंडी नृत्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम पारितोषिक रोख १० हजार रुपये तर द्वितीय पारितोषिक ७ हजार रुपये उर्वरित संघांना मानधन देण्यात येणार आहे. अधिक माहिती साठी संपर्क ९४०३९४७०१६,९४२३८३३४८५,९४०४१७२९५९ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.






