माजी मंत्री बंटी पाटील यांचे सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले सांत्वन

कोल्हापूर येथील निवासस्थानी घेतली भेट

माजी राज्यपाल डी.वाय. पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र माजी मंत्री बंटी पाटील यांची आज जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी कोल्हापूर येथील निवासस्थानी भेट घेतली.
डी. वाय. पाटील यांचे नुकतेच निधन झाले.त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबीयांवर शोककाळा पसरली आहे. आज कोल्हापूर येथे बंटी पाटील यांची भेट घेऊन श्री. सावंत यांनी त्यांचे सांत्वन केले. यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील, हरकुळ बुद्रुकचे सरपंच बंडू ठाकूर आदी उपस्थित होते. डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील (डी. वाय. पाटील) हे महाराष्ट्रातील एक प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि त्रिपुरा, बिहार व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील एका शिक्षण तज्ञाला आणि राजकीय व्यक्तिमत्त्वाला आपण गमावलं अशी प्रतिक्रिया श्री. सावंत यांनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!