अवकाळी वादळामुळे सिंधुदुर्ग हादरला

प्रशासनाला तातडीच्या मदतीचे निर्देश
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी वादळ आणि जोरदार वाऱ्यामुळे घरांचे तसेच वीज व्यवस्थेचे झालेले नुकसान यासंदर्भात आज आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तालुकानिहाय परिस्थितीचा सविस्तर आढावा घेत प्रशासनाला बाधित नागरिकांना तात्काळ आणि जास्तीत जास्त मदत देण्याचे निर्देश देण्यात आले.
जिल्ह्यात वीज आणि पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याबरोबरच नागरिकांशी सतत संपर्क ठेवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, असेही सांगण्यात आले.
भविष्यात हवामान बदल आणि एल-निनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करून प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी ठेवावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणसह सर्व विभागांना मनुष्यबळ, यंत्रसामग्री, ब्रेकडाउन पथके आणि संवाद व्यवस्था सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या बैठकीला पालकमंत्री, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.





