संजय गांधी निराधार योजना समिती बैठकीत तालुक्यातील 38 प्रकरणांना मंजुरी

समिती अध्यक्ष शरद कार्ले, सचिव तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक

कणकवली तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक नुकतीच कणकवली तहसीलदार कार्यालय येथे घेण्यात आली. या बैठकीमध्ये कणकवली तालुक्यातील एकूण 38 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. समितीचे अध्यक्ष शरद कर्ले, सदस्य सचिव दीक्षांत देशपांडे, तहसिलदार कणकवली, मंगेश वालावलकर, सहाय्यक गटविकास अधिकारी, पं. स. कणकवली, गौरी पाटील, मुख्याधिकारी, नगरपंचायत कणकवली, विजय वरक संजय गांधी नायब तहसिलदार, संगायो समिती सदस्य, सुजाता हळदिवे, श्री. विजय कातरूड, श्री. भगवान दळवी, दिपक दळवी व श्री. गुरुनाथ वर्देकर तसेच संजय गांधी शाखा कर्मचारी हे उपस्थित होते. या बैठकीमध्ये संजय गांधी निराधार योजना 25, श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्तीवेतन योजना 13 एकूण मंजूर 38 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.

error: Content is protected !!