कोकण रेल्वे प्रकल्पबाधितांना रोजगारासाठी प्राधान्य – पालकमंत्री नितेश राणे”

“कोकण रेल्वे प्रकल्पासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी आपल्या जमिनी दिल्या. मात्र, आजही अनेक प्रकल्पबाधितांना रोजगाराच्या संधी मिळालेल्या नाहीत, ही अत्यंत गंभीर बाब आहे.

याच पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या शासकीय निवासस्थानी कोकण रेल्वे प्रशासनासोबत विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत प्रकल्पबाधित नागरिकांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

तसेच रेल्वे स्थानकांवरील स्टॉल वाटप, अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्या आणि इतर रोजगाराच्या संधींमध्येही स्थानिक प्रकल्पबाधितांना प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

सिंधुदुर्गातील नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही. प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.

या बैठकीस कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. सुनील नारकर उपस्थित होते.”

error: Content is protected !!