शिवसेना उबाठा कुडाळ शहर महिला पदाधिकाऱ्यांची निवड

कुडाळ शहर संघटकपदी सौ श्रेया गवंडे
उपशहरप्रमुख सौ रोहीणी पाटील आणि सौ दुर्वा गवाणकर
निलेश जोशी । कुडाळ : उबाठा शिवसेना कुडाळ शहर महिला पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच करण्यात आली. कुडाळ शहर संघटकपदी नगरसेविका सौ. श्रेया गवंडे यांची तर उपशहरप्रमुखपदी सौ रोहीणी पाटील सौ दुर्वा गवाणकर यांची निवड करण्यात आली आहे. हि निवड उबाठा शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते सौ जान्हवी सावंत, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक यांच्या सुचनेनुसार करण्यात आली आहे.
शहराची बैठक नुकतीच खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली!
शिवसेना उबाठा गटाची कुडाळ शहर बैठक नुकतीच सिध्दीविनायक सभागृहात खा राऊत,आम नाईक यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते अतुल बंगे, कुडाळ शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका शिवसेना संपर्कप्रमुख बाळा म्हाडगुत,युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, नगरसेवक सचिन काळप, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका श्रेया गवंडे, नगरसेविका श्रुती वर्दम, नगरसेवीका सौ ज्योती जळवी, नगरसेविका सयी काळप, कुडाळ शिवसेना शहरप्रमुख सौ मेघा सुकी, कुडाळ तालुका शिवसेना तालुका संघटक सौ दळवी,सौ अर्चना तायशेटे, आदी उपस्थित होते
यावेळी कुडाळ शहरप्रमुख संतोष शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे अतिशय चांगले काम सुरु आहे. महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांच्या माध्यमातूनदेखील अतिशय चांगले काम सुरू आहे. त्याचीच पोचपावती म्हणून आजची ही उपस्थितीती आहे असे खा राऊत यांनी सांगितले. उपनगराध्यक्ष किरण शिंदे, युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, शहरप्रमुख संतोष शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना संघटनेचे काम अगदी जोमाने सुरू आहे याचे समाधान आहे. कुडाळ मधील मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह, कुडाळ एस टी स्टॅण्ड,भंगसाळ बंधारा आणि कुडाळ शहरातील विकास कामे ही ठळक कामे आहेत, असे खासदार विनायक राऊत यावेळी म्हणाले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.