रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवारी वरून “हिल, ट्रीट” मेंड बैठकीची जिल्ह्यात चर्चा!

बैठकीतील निर्णयाचा “उदय” होत मतदारसंघावर “किरणे” पडणार का? कार्यकर्त्यांना उत्सुकता
तपशील गुलदस्त्यात, एकत्रित मिटींगला जिल्ह्यात येऊन देखील अनुपस्थिती
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवारीवरून गेले काही दिवस दावे – प्रतिदावे व राजकारण जोरात असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात हायवे वर असलेल्या एका ठिकाणी “हिल”, “ट्रीट” मेंडवर असलेल्या ठिकाणी झालेल्या “स्पेशल ट्रीट मेंड” वाल्यांची एक गुप्त बैठक झाल्याची खात्रीशीर सूत्रांकडून माहिती समोर आली आहे. राजकारणातील एका “दादा” माणूस व या निवडणुकीत “किरणोदय” ची छाप पाडून राजकारणात “उदय” करू पाहणाऱ्या नेत्याची आज अत्यंत महत्त्वपूर्ण व गोपनीय बैठक झाल्याची सूत्रांची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली आहे. या बैठकीतील अधिकचा तपशील समजला नसला, तरी लोकसभेच्या उमेदवारी बाबत या गुप्त बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली अशी माहिती त्या गटाच्या खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली. येत्या चार दिवसात या गुप्त बैठकी मधील निर्णयाचा “उदय” होऊन त्याची “किरणे” येथे पडतील काय? अशी चर्चा पुन्हा सुरू होऊ लागली आहे. व कार्यकर्त्यांना देखील याची उत्सुकता लागून राहिली आहे. यातून एका राजकीय नवीन समीकरणाचा “उदय” होण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची बैठक झाल्याचे समजते. दरम्यान याबाबत आज कुडाळ मध्ये झालेल्या एका बैठकीला या मोठ्या नेत्याने हजेरी न लावताच गुप्त चर्चेचा या निमित्ताने “उदय” न करणे पसंत केल्याचेही बोलले जाते. मात्र या संपूर्ण प्रकरणा बाबत आज दिवसभरात प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली होती.
दिगंबर वालावलकर/ कणकवली