आचरा येथे ‘चांद्र यान _3’ वर चित्रकला स्पर्धेचे आयोजन

सहभागी होण्याचे आवाहन

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या संस्थेने मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शनिवार दि.९/९/२०२३ रोजी दुपारी ठीक २.३० वाजता इयत्ता – ५ वी ते ७ वी (आचरा शाळा मर्यादित) विद्यार्थ्यांसाठी श्री. आबा रेडकर, श्री. विवेक सुखटणकर व श्री. प्रकाश महाभोज पुरस्कृत ‘चित्रकला स्पर्धा’ आयोजित केली आहे. प्रत्येक शाळेतून फक्त ६ विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. संस्थेतर्फे चित्र काढण्यासाठी फक्त कागद पूरविला जाणार असून खडू रंग, वॉटर कलर, पेन्सिल, ब्रश, खोडरबर, पट्टी इ. साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणायचे आहे. स्पर्धकांनी कुठेही स्केचपेनचा वापर करू नये. चित्र काढण्यासाठी चांद्रयाण -3 हा विषय असून चित्र काढण्यासाठी १ तास वेळ देण्यात आलेला आहे.
विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेची बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना श्री.प्रकाश महाभोज यांजकडून आकर्षक भेटवस्तु दिली जाणार आहे. तरी आचरे गावातील सर्व शाळांनी या स्पर्धेत सहभाग देऊन स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री.बाबाजी भिसळे व कार्यवाह श्री.अर्जुन बापर्डेकर, सर्व कार्यकारिणी व सांस्कृतिक समिती सदस्य यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी ग्रंथपाल सौ.विनिता कांबळी -९४२१२६३३४६ या नंबरवर संस्थेच्या कामकाजाच्या वेळेत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आचरा(प्रतिनिधी)

error: Content is protected !!