सर्वसामान्य जनतेशी, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा २८ ऑगस्टपासून जनता दरबार…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी दिली माहिती…

मुंबई – सर्वसामान्य जनतेशी, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा जनता दरबार पक्षाच्या प्रदेश कार्यालयात दिनांक २८ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे.

मंगळवार, बुधवार आणि गुरुवार सकाळी ९ ते ११ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजता क्रीडा मंत्री संजय बनसोडे, दुपारी २ ते ४ कृषीमंत्री धनंजय मुंडे, सायंकाळी ४ ते ६ अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे उपस्थित राहणार आहेत. तर बुधवारी सायंकाळी ४ ते ६ सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजता मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, सायंकाळी ५ ते ७ महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत.

error: Content is protected !!