राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांच्या सह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावड़े यांचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक व कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांच्यासह शिष्टमंडळाने भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्ह्याधिकारी तावड़े यांनी सिंधुदुर्ग मधील जनतेची कामे मार्गी लावणार, तसेच विकासकामे मार्गी लावणार असे आश्वासित केले. त्याप्रसंगी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर, प्रांतिक सदस्य सावळाराम अनावकर, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, माजी राष्ट्रवादी ग्राहक सरंक्षण जिल्हाध्यक्ष दिलीप वर्णे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेश महासचिव शफीक खान, अल्पसंख्यक जिल्हा उपाध्यक्ष सरफराज नाईक,राष्ट्रवादी व्ही जे एन टी सेल जिल्हाअध्यक्ष अशोक पवार,आदि उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी





