मोबाईलच्या दुष्परिणामा पासून पालकांनी सतर्क रहा

वागदे शाळेमध्ये कायदेविषयक जनजागृती
जिल्हा परिषद शाळा वागदे डंगळवाडी मध्ये आज कायद्याविषयी जनजागृती करण्याकरिता , कणकवली पोलीस स्टेशनच्या , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निकिता एडवे यांनी , महिलांना कायदेविषयक माहिती दिली.तसेच लहान मुलांना मोबाईल वापराचे दुष्परिणामही सांगितले.त्याचबरोबर वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण यांनी वाहतुकीचे नियम व् आपली कर्तव्य याविषयी पालकांची जनजागृती केली.तर वागदे बीट अंमलदार मनोज गुरव यांनी , सायबर क्राईम याविषयी पालकांना माहिती दिली. व सतर्कता बाळगण्यास सांगितली.तसेच पोलीस हवालदार स्नेहल राणे , यांनीही मार्गदर्शन केले.
त्याप्रसंगी शाळेमध्ये ,निपुण अभियान अंतर्गत लीडर मातांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.तर मान्यवरांच्या हस्ते प्राप्त गणवेशांचेही वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दिनेश जाधव यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षिका वेदिका चव्हाण यांनी मानले.
त्याप्रसंगी उपस्थित
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश तोरस्कर, माजी अध्यक्ष श्री किशोर मेस्त्री शाळा व्यवस्थापन समिती शिक्षण प्रेमी सौ संगीता परब, उपाध्यक्ष सौ संगीता गावडे, माता पालक उपाध्यक्ष प्राची आमडोसकर, अंगणवाडी ताई सौ सुनिता ताटे, सहकारी शिक्षिका सौ वेदिका चव्हाण, मुख्याध्यापक दिनेश जाधव आदी उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी





