कोयत्या हल्ला प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

संशयिताच्या वतीने ॲड. विलास परब यांचा युक्तिवाद
दिनांक1/06/2020 सकाळी 11:30 वाजता वैभववाडी कोळपे येथील रहिवाशी लक्ष्मी माने आणि त्यांची भावजय शितल विजय पवार हि आपल्या घरात पापड लाटत असताना त्याच घरात एका बाजूला राहणारा फिर्यादीचा दिर हा प्रभाकर तुकाराम माने हातात कोयता घेऊन आला, त्याने शिवीगाळ केली आणि अचानकपणे दोघींच्याही डोक्यावर पाठीमागून कोयत्याने वार केले, तसेच लक्ष्मीच्या पाठीवर आणि उजव्या हाताच्या अंगठ्यावर देखील कोयता मारला, लक्ष्मी आणि शितल यांनी त्याला अडवले असता त्यांच्यात झटापट झाली, त्यांनी आरडाओरड केली असता शेजारीच गोठ्यात काम करणारा फिर्यादीचा नवरा धावत आला, शेजारी आले आणि त्यांनी आरोपीच्या ताब्यातून कोयता काढून घेतला. अशी फिर्याद लक्ष्मी माने हिने वैभववाडी पोलीस स्टेशन येथे दाखल केली असता भा.द.वि.कलम 324, 504,506,34 नुसार आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सुनावणी कामी फिर्यादी, पंच, फिर्यादीचा नवरा, शेजारी, डॉक्टर, तपासिक अंमलदार यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. साक्षिदारांच्या जबाबातील विसंगती, विशेषत आरोपीच्या अंगावरील घटनेच्या वेळी झालेल्या जखमांचे फिर्यादी पक्षातर्फे स्पष्टीकरण न दिल्याने आणि सबळ पुराव्या अभावी कणकवली न्यायालयाने आरोपी प्रभाकर माने यांची निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. विलास परब, ॲड. तुषार परब यांनी काम पाहिले.






