श्री.संत रविदास महाराजांच्या स्मृती कलशाचे कणकवलीत उत्स्फूर्त स्वागत.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित ‘संत शिरोमणी श्री.गुरु रविदासजी महाराज समरसता संकल्प अभियान’अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन.
कणकवली : प्रतिनिधी
श्री.संत शिरोमणी गुरु श्री.रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘संत शिरोमणी श्री.गुरु रविदासजी महाराज समरसता संकल्प अभियान’अंतर्गत स्मृती कलशाचे शनिवारी कणकवलीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
या कलशाची कणकवली येथील पटवर्धन चौकातून हुमरमाळा येथील समाज मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर स्मृती कलश दर्शनासाठी हुमरमाळा समाज मंदिरात ठेवण्यात आला. सामाजिक एकता,समता आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी जिल्हा संयोजक बुवा श्री.संतोष कानडे,सहसंयोजक श्री.श्रीकृष्ण परब, कणकवली तालुकाध्यक्ष श्री.मिलिंद मेस्त्री, कणकवली शहराध्यक्ष श्री.अण्णा कोदे,ओरोस मंडल अध्यक्ष श्री.भाई सावंत,जिल्हा परिषद सदस्या सौ.सुप्रिया वालावलकर,जिल्हा परिषद सदस्य शिरगाव श्री.देवदत्त कदम,भाजपा अनुसूचित जाती आघाडी जिल्हाध्यक्ष श्री.गौतम गुडकर,सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ जिल्हाध्यक्ष श्री.सुजित जाधव,सचिव श्री.चंद्रसेन पाताडे, कणकवली तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळ अध्यक्ष श्री.महेंद्र चव्हाण,सिंधुदुर्ग जिल्हा युवाध्यक्ष श्री.प्रकाश वाघेरकर,भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्री.राजेंद्र चव्हाण,श्री.सुंदर जाधव,वैभववाडी चर्मकार समाज उन्नती मंडळ अध्यक्ष श्री.अनंत नेवरेकर, पंचायत समिती सदस्य जाणवली सौ.ऐश्वर्या चव्हाण,चर्मकार समाज उन्नती मंडळ जिल्हा खजिनदार श्री.नामदेव जाधव,श्री.राजन वालावलकर,कुडाळ तालुकाध्यक्ष चर्मकार समाज उन्नती मंडळ श्री.संतोष चव्हाण,कुडाळ सचिव श्री.नरेश चव्हाण, श्री.निलेश वाघेरकर तसेच संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई, महाराष्ट्रचे संस्थापक राज्य उपाध्यक्ष श्री.पंढरी जाधव यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत रविदास महाराजांच्या समता, सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाच्या विचारांचा जागर करण्याच्या या उपक्रमाने जिल्ह्याभरात भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.






