माजी आमदार वैभव नाईक यांनी बंटी पाटील, संजय पाटील यांचे केले सांत्वन

डॉ.पद्मश्री डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
शिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांचे नुकतेच निधन झाले. या पार्श्वभूमीवर डॉ. डी वाय पाटील यांचे सुपुत्र काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील व संजय पाटील यांची कोल्हापूर येथील निवासस्थानी भेट घेत माजी आमदार वैभव नाईक यांनी त्यांचे सांत्वन केले. डॉ. डी वाय पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेले काम व समाजासाठी केलेले काम हे मोठे असून त्यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना माजी आमदार वैभव नाईक यांनी या प्रसंगी व्यक्त केली.






