एसटी प्रवास सवलतीसाठी एनसीएमसी कार्ड नोंदणी चे कणकवली मध्ये शिबिर

सहभागी होण्याचे नगरसेविका मेघा सावंत, महेश सावंत यांचे आवाहन

1 ऑगस्ट पासून महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या साठी NCMC कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे..
एस टी बस मधून प्रवास करण्यासाठी व प्रवासी सेवांमध्ये सवलत मिळण्यासाठी NCMC कार्ड नोंदणी आवश्यक आहे. NCMC कार्ड काढणे आपल्या वार्डामधील किंवा इतर नागरिकांना सोयीस्कर व्हावे यासाठी रविवारी 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत कणकवली साहिल अपार्टमेंट टेंबवाडी येथे शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. त्याचबरोबर वैद्यकीय सरकारी योजनासाठी आयुष्यमान व आभा कार्ड नोंदणी देखील करण्यात येईल.. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. जेणेकरून गर्दीत जाऊन रांगेत उभे राहून कार्ड काढण्यापेक्षा आपल्या वॉर्डमध्येच तुम्हाला ही सेवा उपलब्ध करून दिली आहे त्याचा लाभ घ्या असे आवाहन कणकवली नगरपंचायत प्रभाग क्रमांक 9 च्या नगरसेविका सौ. मेघा महेश सावंत व महेश सावंत यांनी केले आहे. नोंदणी करताना लागणारे कागदपत्र

  1. आधार कार्ड
  2. आधार लिंक मोबाईल
    अधिक माहितीसाठी 94210 02414 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
error: Content is protected !!