श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचा स्मृती कलश आज सिंधुदुर्गात

आज 10 वाजता कणकवली पटवर्धन चौक या ठिकाणी स्मृती कलश दर्शनासाठी
श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६५० वी जयंती २० फेब्रुवारी २०२७ रोजी संपन्न होणार आहे.या निमित्ताने भारतीय जनता पार्टी च्या वतीने २९ जुलै २०२६ पासून (गुरुपौर्णिमा) रविदास महाराज जयंती पर्यंत २० फेब्रुवारी २०२७ पर्यंत संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज समरसता संकल्प अभियान राबविण्यात येत आहे.सामाजिक एकता व समता यांचा संदेश देशभरात देण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. ( शनिवार ता.८ ऑगस्ट) या अभियानांतर्गत कलश सिंधुदुर्गात येत असून सदर कलशाचे पूजन पटवर्धन चौक कणकवली या ठिकाणी सकाळी 10 वाजता आयोजित केले आहे.त्या नंतर संत रविदास भवन हुमरमळा* ता.कुडाळ येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.तरी सदर कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती.
आपले,
जिल्हाध्यक्ष – श्री प्रभाकर सावंत (भारतीय जनता पार्टी )
संयोजक – श्री संतोष कानडे
सहसंयोजक – श्री श्रीकृष्ण परब






