आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे मध्ये रानभाज्या प्रदर्शन संपन्न.

कणकवली/मयूर ठाकूर

निसर्गातून आपल्याला उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या ज्या शरीरालाही पोषक असतात आणि त्यांचे औषधी गुणधर्मही तेवढेच महत्त्वाचे असतात अशा प्रकारे या रानभाज्यांच्या संबंधी अधिक माहिती व त्यांचे मुलांना समजण्यासाठी रानभाज्या प्रदर्शनाचे आयोजन ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सायन्स वरवडे या प्रशालेत करण्यात आला होता ज्यूनियर के.जी ते इयत्ता तिसरी पर्यंतचे विद्यार्थी या रानभाज्या प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते.
शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्ष प्रियांका खरबस मॅडम या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्याच हस्ते फीत कापून या प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले,त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत प्रमुख अतिथी म्हणून ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बुलंद पटेल सर आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई मॅडम तसेच शिक्षक पालक संघाचे सदस्य राधिका पुणेकर मॅडम, कीर्ती मुसळे मॅडम,आदिती पाटकर मॅडम,इंग्लिश स्कूलचे कॉर्डिनेटर निलेश घेवारी सर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रदर्शनामध्ये मुलांनी फोडशी, कुरडू,भारंगी, फागला, अळू,शेवगा सुरण पुण्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा,अशा प्रकारच्या विविध भाज्यांचे प्रदर्शन मांडलेले होते. इयत्ता के.जी ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी या भाज्यांचे महत्त्व या भाज्यांचे औषधी उपयोग सर्व उपस्थितांना पटवून सांगितले.
या कार्यक्रमासाठी मान्यवर त्याचप्रमाणे इयत्ता के.जी ते तिसरी पर्यंतच्या सर्व शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ परिमला गोडवे मॅडम यांनी केले या कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिया मुंज मॅडम, निधी गुरव मॅडम, श्रेया कसवणकर मॅडम, त्याचप्रमाणे सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख वैष्णवी मोर्वेकर मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!