आचरा पोलीस स्टेशन स.पो निरिक्षक पदी संजय कातीवले

आचरा सरपंच फर्नांडिस यांनी दिल्या शुभेच्छा

आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांची सागरी सुरक्षा शाखा ओरोस येथे बदली झाल्याने रिक्त जागी विजयदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला.यावेळी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी आपण सर्वतोपरी सहकार्य देण्याची ग्वाही सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांनी दिली.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे, पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार,आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर ,अभय भोसले, ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर,चंदू कदम, माजी सरपंच अनिल करंजे, पांडुरंग वायंगणकर, डॉ प्रमोद कोळंबकर,उदय घाडी, जगदीश पांगे,प्रफुल्ल घाडी, शैलेश मुणगेकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!