आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज वरवडे मध्ये आयडियल स्टडी अँप च वितरण उत्साहात संपन्न.

कणकवली:मयूर ठाकूर
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी व रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्या वतीने इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी वितरण सोहळा नुकताच ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज कॉमर्स आणि सायन्स वरवडे या प्रशालेत संपन्न झाला सर्वप्रथम रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल च्या अध्यक्षा सुप्रिया नलावडे मॅडम यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केलं त्यानंतर या वितरणासाठी उपस्थित रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी चे सर्व पदाधिकारी तसेच रोटरी क्लब कणकवली सेंटरचे पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी चे अध्यक्ष डॉ.कैलास दातरंगे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना आळस झटकून आपण मनात एखादं ध्येय ठरवलं तर ते ध्येय निश्चिती करता प्रयत्न केले पाहिजे असे मत मनोगतातुन म्हणून व्यक्त केलं तर या ॲपचे निर्माते अमोल कामत सर यांनी यांनी या स्टडी ॲप बद्दल सर्व माहिती स्टडी अँप कशाप्रकारे वापराव हे विद्यार्थ्यांना सांगितलं त्यासोबतच या स्टडी अँप मधली असलेली सगळी फीचर्स विद्यार्थ्यांना समजावून देत अधिकाधिक गुण दहावीच्या परीक्षेमध्ये प्राप्त करण्यासाठी हे स्टडी अँप किती महत्त्वपूर्ण आहे हे आपल्या उगवत्या शैलीतुन त्यांनी व्यक्त केला. यानंतर आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे, वामनराव महाडिक विद्यालय तळेरे,सांडवे हायस्कूल सांडवे,आणि ल. गो. सामंत विद्यालय विद्यालय हरकुळ बुद्रुक या प्रशालेतील विद्यार्थ्यांना या स्टडी अँप च वितरण करण्यात आले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळजवळ आतापर्यंत साडेतीन हजार स्टडी अँप चे वितरण केलं जात आहे
या नवीन तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास सुलभ आणि सोपा व्हावा त्याचप्रमाणे अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी अभ्यासातील कठीण समस्या सोप्या होऊन जाव्यात या अनुषंगाने अगदी दहावी पासून अकरावी प्रवेश घेईपर्यंत करिअर मार्गदर्शनासहित सगळा घटकांचा समावेश असणाऱ्या हे स्टडी ॲप विद्यार्थ्यांना वितरित करून रोटरी क्लब न खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपला एक वेगळा ठसा निर्माण केला आहे.
या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी चे अध्यक्ष डॉ.कैलास दातरंगे,रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी चे सेक्रेटरी रोटरीयन निखिल आपटे सर,रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल च्या अध्यक्षा सौ.सुप्रिया नलावडे मॅडम,कणकवली सेंट्रल चे सेक्रेटरी डॉ. अमेय मराठे रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी चे ट्रेझरर शहा साहेब,रोटरी क्लब झोनल कॉर्डिनेटर शशिकांत चव्हाण सर,असिस्टंट गव्हर्नर अभिषेक माने सर या प्रोजेक्टचे प्रोजेक्ट हेड अमोल कामत सर,तसेच वंदना कामत मॅडम,रोटरीचे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी डॉ.विद्याधर तायशेटे, ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बुलंद पटेल सर, आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई मॅडम,रोटरी रेवेन्यू डिस्ट्रिक्ट चेअरमन वर्षा बांदेकर मॅडम,आदी मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे वामनराव महाडिक विद्यालय तळेरेचे शिक्षिका आणि सांडवे स्कूलचे मुख्याध्यापक श्री महेश पालव त्याचप्रमाणे या स्कूलच्या शिक्षिका सौ मधुरा तांबे मॅडम ल. गो. सामंत विद्यालयाचे श्री डोंबाळे सर आदी मान्यवर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे चे सहाय्यक शिक्षक हेमंत पाटकर यांनी केले तर आभार रोटरी क्लब कणकवली सेंट्रल चे सेक्रेटरी डॉ.अमेय मराठे यांनी व्यक्त केले.






