नागवे मध्ये घरावर फांदी पडून मोठे नुकसान

तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे मोठी पडझड

महसूल कडून उद्यापर्यंत पंचनामे होणार

कणकवली तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्याने तालुक्यात अनेक भागांमध्ये नुकसान झाले असून कणकवली तालुक्यातील नागवे मध्ये पटेल वाडी या ठिकाणी घरांवर झाडांच्या फांद्या पडल्याने घरांचे मोठे नुकसान झाले. तर काही ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले. नागवे तील पटेल वाडी येथील सचिन सावंत यांच्या घरावर आंब्याची फांदी पडून मोठे नुकसान झाले. तर काही ठिकाणी घराचे पत्रे उडून गेले. कणकवली तालुक्यात हा नुकसानीचा आकडा मोठा असण्याची शक्यता असून, महसूल कडून पंचनामे झाल्यानंतरच नुकसानीचा अंतिम आकडा स्पष्ट होणार आहे. उद्यापर्यंत महसूल कडून हे पंचनामे पूर्ण केले जाणार आहेत

error: Content is protected !!