तहसीलदार, नायब तहसीलदारांचे आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत केली निदर्शने

सिंधुदुर्ग : राज्यातील तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना इतर विभागातील वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांएवढा ग्रेड पे वाढवून द्यावा या मागणीसाठी राज्यभरातील 2200 नायब तहसीलदार आणि 600 तहसीलदार यांनी आजपासून (3 एप्रिल) बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची मोठी गैरसोय झालीय.
नायब तहसीलदार हे पद वर्ग दोनचे असले तरी या पदाला इतर विभागांतील समकक्ष वर्ग दोनच्या पदापेक्षा कमी वेतन मिळते. त्यामुळे ग्रेड पे 4300 रुपयांवरुन 4800 रुपये वाढवण्याची मागणी करण्यात आलीय. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तहसीलदार, नायब तहसीलदार, आदींनी ही मागणी केली. यावेळी कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, कणकवली तहसीलदार आर जे पवार पवार, नायब तहसीलदार संतोष खरात, शिवाजी राठोड आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग प्रतिनिधी

error: Content is protected !!