सिंधुदुर्ग गुन्हा अन्वेषण विभागाने गुरांची अवैध वाहतूक पकडली

११ गाई व २ वासरे मिळून १३ जनावरे ताब्यात
संबंधितांवर गुन्हे दाखल
कणकवली : सिंधुदुर्ग गुन्हा अन्वेषण विभागाने अवैधरीता गायींची वाहतूक पकडली आहे.या कारवाईत ११ गाई व २ वासरे मिळून १३ जनावरे ताब्यात घेण्यात आले आहे.याप्रकरणी अज्ञात टेम्पो चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,गुन्हा अन्वेषण शाखेचे हवालदार प्रमोद काळसेकर यांना रात्र ३ वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरून अवैधरीता गायींची वाहतूक होत असल्याची खबर मिळाली होती.त्या अनुषंगाने हवालदार काळसेकर यांनी गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक संदीप भोसले यांना माहिती कळविली .महामार्गावर तीन ठिकाणी गस्तीपथके नेमण्यात आली होती.एक पथक कसाल मध्ये कार्यरत असताना ओसरगाव टोल नाक्या पुढे कणकवलीच्या दिशेने आयशर टेम्पो उभा असल्याचे समजले. पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली.तत्पूर्वी चालक चावी घेऊन पसार झाला होता, पोलिसांनी त्या टेम्पो मधील ११ गाई व २ वासरे मिळून १३ जनावरे ताब्यात घेतली.पोलिसांच्या या कामगिरीमुळे तेरा मुक्या प्राण्यांचे जीव वाचले आहेत.
काल रात्रीच्या सुमारास गुन्हा अन्वेषण शाखेतील पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर यांना (एम. एच. ०७ – पी- ३६५२)या आयशर टेम्पो मधून गुरांची वाहतूक होत असल्याची खबर मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी गस्तीपथके तैनात केली, याच वेळी कसाल येथे असलेल्या पथकातील प्रमोद काळसेकर यांना पुन्हा फोन आला व त्यांनी हा टेम्पो ओसरगाव टोल नाक्याजवळ असल्याचे सांगितले पोलिसांनी तातडीने तिथे जात कारवाई केली.
या कारवाईत 11 गायी दोन वासरे मिळून 13 जनावरे आढळून आली,यातील एक गाय हिला उठा बसता येत नसल्यामुळे तिच्यावर कणकवली पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत,तर बारा गाईंना सुडकुली धाम सरंबळ कुडाळ या ठिकाणी देखभाल खाली ठेवण्यात आले आहेत. याप्रकरणी निर्दयीपणे गुरांची वाहतूक करणे, त्यांचे हाल करणे,या कलमाखाली अज्ञात टेम्पो चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कणकवली प्रतिनिधी