वरक परिवाराचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव संपन्न

कुडाळ : सरंबळ धनगरवाडी येथील दाढ साकळ मित्रमंडळ वरक परिवाराचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव काल मोठ्या उत्साहात संपन्न झाला. काल दुपारी १ वाजता देवीचे पूजन, ओटी भरणे, हा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता विश्वकर्मा दशावतार नाट्य मंडळ, नेरूरचा नाट्यप्रयोग आणि ८ वाजता भोजन तसेच रात्री १० वाजता गोंधळ उत्सव पार पडला. यावेळी शिवसेना ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांनी गोंधळ उत्सवाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी सागर परब, महेश सरंबळकर, अरुण कदम, योगेश परब, वरक परिवारातील मंडळी उपस्थित होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ






