कळसुली जि. प. मतदार संघातील अनेक विकास कामांकरता कोट्यावधींचा निधी

गेली अनेक वर्षांची जनतेची मागणी झाली अखेर पूर्ण

भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी आमदार नितेश राणे यांचे व्यक्त केले आभार

कणकवली तालुक्यातील कळसुली जि. प. मतदार संघातील अनेक विकास कामांना आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा विकास निधी आल्याने कळसुली जि प अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये अनेक विकास कामे येत्या काळात मार्गी लागणार आहेत. यात शिरवल जोड रस्त्याच्या ग्रामीण मार्गाच्या कामाकरिता 3 कोटी 7 लाख 69 हजार, राज्यमार्ग 66 ओसरगाव गावठाणवाडी, सडेवाडी, बौद्धवाडी, ओसरगाव असरोंडी रस्ता या रस्त्याच्या कामासाठी 4 कोटी 83 लाख रुपयांचा निधी आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. गेली अनेक वर्ष हे रस्ते मार्गी लावण्याची मागणी येथील जनतेतून केली जात होती. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारमुळे हीच कामे मार्गी लागत नव्हती. अखेर आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून भाजपा – शिवसेना युतीच्या माध्यमातून नितेश राणे यांनी येथील जनतेच्या मागणीला निधी आणून देत पूर्णत्वास नेले आहे. लवकरच ही कामे मार्गी लागणार असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी दिली.

दिगंबर वालावलकर / कणकवली

error: Content is protected !!