कुडाळ नगरपंचायतीच्या दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत ६४ लाभार्थ्यांना व्यवसायासाठी लाभ मंजूर

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या २०२२-२३ दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत ६४ दिव्यांग लाभार्थ्यांना व्यवसाय उभारण्यासाठी लाभ मंजूर झाला आहे. हा लाभ लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती कुडाळच्या नगराध्यक्षा आफरीन करोल यांनी दिली. ६४ दिव्यांग लाभार्थ्यांना व्यवसाय उभारण्यासाठी लाभ मंजूर करून देण्यात महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी विशेष मेहनत घेतली.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!