पाट हायस्कूल मध्ये इंग्रजी दिवस साजरा

निलेश जोशी । कुडाळ : इंग्रजी विषयाचे महत्त्व पटविणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून पाट हायस्कूलमध्ये इंग्रजी दिवस साजरा करणार आला. मुलांमध्ये इंग्रजी विषयाची भीती घालवण्यासाठी व इंग्रजी विषयाची आवड निर्माण व्हावी या हेतूने दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षीही इयत्ता पाचवी ते नववी आणि इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.


कार्यक्रमाची सुरुवात भारताच्या संविधानाने करण्यात आली विविध संवाद, कथा, नृत्य, भाषणे व खेळाच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्था संचालक संजय ठाकूर होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक शामराव कोरे, पर्यवेक्षक ,राजन हंजनकर, शिक्षक प्रतिनिधी गुरुनाथ केरकर, ज्येष्ठ शिक्षिका दीपिका सामंत, ज्येष्ठ शिक्षिका सौ जान्हवी पडते, ज्येष्ठ शिक्षक श्री बोंदर सर, इंग्रजी विषयाचे ज्येष्ठ शिक्षक तानाजी काळे सर, आंबेरकर सर, कनाथ जाधव सर उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी कस्तुरी राऊळ तर या कार्यक्रमाचे आभार नेहा ठाकूर या विद्यार्थिनीने मानले. इंग्रजी विषयाचे सर्व शिक्षक पी एस जाधव सर , सौ.साळगावकर मॅडम, सौ. मोडक मॅडम यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

निलेश जोशी,कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!