वेताळ बांबर्डेत उद्या भव्य आरोग्य शिबिर
कुडाळ : महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग सिंधुदुर्ग, ग्लोबल फाउंडेशन आणि ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिर उद्या, शनिवार १८ मार्च २०२३ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. हे आरोग्य शिबिर मांगल्य मंगल कार्यालय वेताळ बांबर्डे येथे होणार असून याचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या हस्ते होईल. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी विजय चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, डॉ. श्याम राणे, डॉ. राजेश पालव, डॉ. प्रणव प्रभू. डॉ. महिंद्रे, डॉ. अपूर्वा ठाकूर, डॉ. रवीना चव्हाण, राजेश पारधे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. या आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वेताळ बांबर्डे ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ