मळेवाड येथे १९-२० रोजी प्रवचन भंडारा उत्सव

सावंतवाडी : मळेवाड-कुभांरवाडी येथे १९ आणि २० मार्च रोजी भंडारा उत्सव साजरा होणार आहे. मळेवाड-कुभांरवाडी येथील ज्ञानकर्म भक्ति आणि मुक्ति संस्थेच्या मठात हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ठीक १० वाजता श्री संत सद्गुरू आनंदी गुरूजी यांचे प्रवचन संसारात राहून उत्तमरित्या परमार्थ कसा साधावा व नाम साधनेने परमेश्वर प्राप्ती कशी करून घ्यावी याबद्दलचा सरळ आणि सोपा मार्ग परम संताच्या वाणीतून ऐकवायला मिळणार आहे. त्यानंतर सद्गुरू दर्शन, महाप्रसाद होणार आहे. भजन भक्तीगीताचा कार्यक्रम दोन दिवस होणार आहे. भाविकांनी प्रवचन व भडांरा उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन ज्ञान कर्म भक्ति आणि मुक्ति संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, सावंतवाडी

error: Content is protected !!