भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरांवर कारवाई सुरू

कुडाळ पोलिसांनी ९ डंपरवर केली कारवाई

कुडाळ : कुडाळ पोलिसांनी भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत ९ डंपरवर दंडात्मक कारवाई केली आहे अशी ही कारवाई आता दररोज सुरू राहणार अशी माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर यांनी दिली. काही दिवसांपासून भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपर व ट्रकमुळे अपघात होत आहेत. या अपघातामधून अनेकांना दुखापती झाल्या. या पार्श्वभूमीवर कुडाळ पोलिसांनी आता भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपर व ट्रकवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन दिवसात कुडाळ पोलिसांनी ४ भरधाव वेगाने धावणाऱ्या चार डंपरवर तर लायसन नसलेल्या चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यापुढील काळात अशा प्रकारे कारवाई सुरू राहणार आहे अशी माहिती कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर यांनी दिली आहे.

रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!