आचरेकर प्रतिष्ठानच्या सघन गान शिक्षण केंद्राच्या विद्यार्थ्यांचा गुरुवंदन सोहळा 27 ऑगस्ट रोजी…

कणकवली – वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली ही संस्था गेली 45 वर्ष सांस्कृतिक क्षेत्रातील विविध कलांचे जतन,संवर्धन आणि त्याचे शिक्षण देण्याचे काम करीत आहे. गेली 45 वर्ष नाथ पै एकांकिका स्पर्धा, 25 वर्ष मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्यमहोत्सव व गेली २३ वर्ष शास्त्रीय संगीत महोत्सव व वामनदाजी शास्त्रीय संगीत गायन स्पर्धा आयोजित करीत आहे. या आयोजनाबरोबरच संस्था गेली 16वर्षे पंडित जितेंद्र अभिषेकी सघंन गान शिक्षण केंद्र चालवत असून. या केंद्रामार्फत शास्त्रीय संगीताचे दर्जेदार शिक्षण दिले जाते. गेली 16 वर्ष या सघन गान केंद्राच्या माध्यमातून पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य पंडित समीर दुबळे हे येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. संस्था ज्यांच्या नावाने संस्था चालवीत आहे ते कै.वसंतराव आचरेकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक होते ही गोष्ट लक्षात घेऊन या जिल्ह्यातही उत्कृष्ट तबलावादक निर्माण झाले पाहिजेत या हेतूने यावर्षी पासून संस्थेने तबलावादनाचा क्लास सुरू केला आहे. यासाठी गुरु श्री चारुदत्त फडके हे पुण्यावरून कणकवली येथे येऊन विद्यार्थ्यांना तबलावादनाचे प्रशिक्षण देत आहेत.
गतवर्षीपासून पंडित जितेंद्र अभिषेकी सघन गान शिक्षण केंद्राचे विद्यार्थी पंडित समीर दुबळे यांचे महाराष्ट्र भर असलेले इतर शिष्य व संस्था या केंद्राचे गुरुं प्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रम आयोजित करीत आहेत.यावर्षीही या कार्यक्रमाचे आयोजन केले असून यात गुरू आदरणीय पं. समीर दुबळे व गुरु चारुदत्त फडके यांच्या प्रति आदरभाव व्यक्त करण्यात येणार आहे. हा गुरुपौर्णिमा सोहळा रविवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी संस्थेच्या नाट्यगृहात संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध गायक वसंतराव मराठे (पुणे)हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे…
सकाळी ९ ते ९:१५ गुरुपूजन कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा
सकाळी ९:१५ ते १२:३० : सघन गान शिक्षण केंद्राचे विद्यार्थ्यांचं गायन सादर होणार आहे. दुपारच्या सत्र ४ ते ९ कालावधीत होणार असून त्यात तबला वादन क्लासचे विद्यार्थ्यांचे सोलो तबलावादन व गायन सादर होणार आहे. त्यानंतर ६:१५ ते ७ गुरु श्री चारुदत्त फडके यांचे एकल तबला वादन ७ ते ७ ३०गुरुपूजन सोहळा संपन्न होईल त्यानंतर ७:३० ते ७:५० या वेळेत सुप्रसिद्ध गायक वसंतराव मराठे यांचे गायन व त्यानंतर सघन गान केंद्राचे गुरु पंडित समीर दुबळे यांचे गायन सादर होणार आहे.
संपूर्ण दिवस चालणाऱा हा गुरुपौर्णिमा सोहळा विनामूल्य असून सर्व संगीत प्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. एन. आर. देसाई यांनी केले आहे.





