काही बांडगुळांच्या सांगण्यावरून सांगवेतील समाज मंदिरासाठीचे उपोषण!

ग्रामस्थांचा निवेदनाद्वारे बीडीओंकडे आरोप
उपोषणकर्त्या ग्रामस्थांचा निवेदनकर्त्यांनी केला निषेध
सांगवे आंबेडकरनगरचे ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य अर्जुन नामदेव कांबळे, सुनिल रामचंद्र कांबळे, विश्वनाथ रामचंद्र कांबळे, सागर अनंत चव्हाण, संतोष राघो चव्हाण, भाग्योदय भिकाजी कांबळे,भिकाजी भागोजी कांबळे, प्रदिप अंकुश कदम हे सर्व ग्रामस्थ समाज मंदिराच्या अपूर्ण कामासंदर्भात काल पासून सांगवे ग्रामपंचायत समोर ‘उपोषणाला बसलेले आहेत. यासंदर्भात सांगवी ग्रामस्थांनी आज कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे,अर्जुन नामदेव कांबळे हे मागासवर्गीय ग्रामपंचायत सदस्य असूनही ते निवडून आल्यापासून आतापर्यंत कधीही वाडीमध्ये कधीही सार्वजनिक बैठक लावलेली नाही. अगर ग्रामपंचायतच्या ज्या काही मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजना यांची माहिती दिलेली नाही. तसेच हे सदस्य होण्या अगोदरसुद्धा कधीही सार्वजनिक बैठका किंवा सार्वजनिक कामासंदर्भात सहभागी होत नाहीत. यांचे वाडीच्या हितसंदर्भात काहीही योगदान नाही. अगर कुठल्याही प्रकारचे सहकार्य नाही. तसेच यासोबत असलेल्या ग्रामस्थांचे सुद्धा वाडीच्या हितसंदर्भात कुठलेही योगदान नाही. सर्वांची अशा प्रकारची वर्तणुक असताना आता हि मंडळी आमच्या गावातील काही समाज विघातक बांडगुळे यांच्या सांगण्यावरून आपल्या राजकिय फायद्यासाठी वाडीतील सलोख्याचे असलेले वातावरण बिघडवून वाडीमध्ये पक्षीय राजकारण आणून वाद निर्माण करण्याचे. काम करत आहेत. मुळात समाज मंदिराच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारची अफरातफर झाली नाही. असे आम्हाला वाटते. आपण याची सखोल चौकशी करावी. आमच्या आंबेडकरनगर मध्ये अतिशय चांगल्याप्रकारे विकास कामे झालेली आहेत. परंतु मुद्दामपणे हि मंडळी समाज मंदिराचा विषय घेवून आमच्या संपूर्ण आंबेडकरनगराची आणि ग्रामपंचायत सांगवे ची नाहक बदनामी करत आहेत. अर्जुन कांबळे व त्यांच्यासोबत असलेले ग्रामस्थ यांचा आम्ही जाहीर निषेध करत असल्याचे या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे. गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांना याबाबतचे निवेदन देताना माजी सभापती महेश गुरव, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, उपस्थित होते. या निवेदनावर समीक्षा कांबळे, अभय कांबळे, मनोज कांबळे, सुलोचना कांबळे, हरी जाधव, चंद्रभागा जाधव, हनुमंत कांबळे, सिद्धार्थ कांबळे, शैलेश कांबळे, विजय कांबळे, विनय कांबळे, प्रसाद सावंत, वेदांगी सावंत यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत. याप्रसंगी विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, राजेंद्र शिंदे उपस्थित होते.
कणकवली /प्रतिनिधी





