कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण मंडळातर्फे गुणवत्ता विद्यार्थ्यांचा उद्या सत्कार

उपस्थित राहण्याचे ज्ञाती मंडळाचे आवाहन
कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण समाज सेवा मंडळ, कणकवली यांच्या वतीने कणकवली तालुक्यातील कुडाळदेशकर आदयगौड ब्राह्मण ज्ञातीतील सन २०२२/२३ या शैक्षणिक वर्षातील गुणवंतांचा गुणगौरव सत्कार सोहळा रविवार ९ जुलै २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता संस्थेच्या फोंडाघाट येथील पूर्णानंद भवन’ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर गुणगौरव कार्यक्रमात सन २०२३ मध्ये झालेल्या इयत्ता दहावी परीक्षेत ८०% आणि त्यापेक्षा अधिक व इयत्ता बारावीच्या
परीक्षेत ७०% आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या तसेच पदवी व पदव्युत्तर परीक्षेत ६०% पेक्षा जास्त गुण
मिळविलेल्या आणि सर्व स्पर्धात्मक, एन.टी.एस., एम.टी.एस., बी.डी.एस., ऑलिम्पीयाड इ. परीक्षेत कणकवली तालुक्यात १ ते ३ क्रमांक प्राप्त करणा-या गुणवंतांसह कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रामध्ये व शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत पाचवी व आठवी इयत्तेत २१० गुण व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करून विशेष प्राविण्य संपादित केलेले गुणवंत व सामाजिक, राजकिय, सांस्कृतिक,शैक्षणिक व कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व पुरस्कार प्राप्त ज्ञातीबांधवांचा सत्कार संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. व सदर कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक व सर्व ज्ञातीबांधव यांनी अगत्यपूर्वक उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
संपर्क -१) श्री. हर्षल उर्फ राजु सुधाकर गवाणकर आप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली ९४२२५८४९००, रामचंद्र तथा बाळा बावकर स्वामी समर्थ दुकान ऑफिसनजिक ९४२१३२२७१५, राजेश महादेव आजगांवकर गजानन इलेक्ट्रिकल्स, एस.टी. स्टँड नजिक कणकवली ९४२१२६६४६४, अरुण वसंत सामंत भगवती प्रिंटिंग प्रेस, फोंडाघाट, बिजलीनगर ९४२३३००००२, प्रथमेश कमलाकर महाजन फोंडाघाट बाजारपेठ रोड ९६७३२१५३५१, या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
कणकवली प्रतिनिधी