जानवली – साकेडी रस्त्यावर झाड पडून वाहतूक ठप्प

कालपासून पडलेले झाड हटवले नसल्याने वाहतूक ठप्प

तातडीने कार्यवाहीची होतेय मागणी

काल शनिवारी झालेल्या पाऊस व वादळी वाऱ्यामुळे कणकवली तालुक्यातील अनेक भागांमध्ये झाडे उन्मळून पडली असून यामध्ये जानवली – साकेडी रस्त्यावर आकेशियाची दोन झाडे रस्त्यावर आडवी पडल्याने या मार्गावरती वाहतूक कालपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. मात्र अद्याप पर्यंत ही झाडे हटवली नसल्याने या मार्गावरून होणाऱ्या एसटी फेरी तसेच अन्य वाहतूक बंद झाल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. काल सायंकाळी च्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला व यामध्ये अनेक घरांची देखील पडझड झाली असून, अनेक घरांवर झाडे पडून नुकसान झाले आहे. त्यातच काही भागांमध्ये रस्ते ठप्प झाल्याने वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे. त्यामुळे याबाबत तातडीने कार्यवाहीची मागणी केली जात आहे.

error: Content is protected !!