भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला रंगणार कसवणला जिल्हास्तरीय काव्यमैफल

मसुरे प्रतिनिधी
नक्षत्राचं देणं काव्यमंच महाराष्ट्र,विभाग सिंधुदुर्ग आयोजित काव्यमैफलीचे नि:शुल्क आयोजन करण्यात आले आहे.
भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती दिनी कसवण बौद्धवाडी ता.कणकवली येथे दि.१४ एप्रिल २०२३ रोजी जिल्हास्तरीय काव्यमैफल आयोजित केलेली आहे.
तरी एक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित कविता व दुसरी आपल्या आवडीची कोणतीही मराठी ,अगर मालवणी कविता सादर करायची आहे. तरी सहभाग घेणार -या कवी/कवयित्रिंनी आपले नाव मोबाईल नंबर 9403228364 कवी श्री.उदय सर्पे व मोबाईल नंबर 9405778726 कवी श्री.राजेंद्र गोसावी ,मोबाईल नंबर 9422633118 कवी सुरेश पवार ,मोबाईल नंबर 9403851877 कवी नरेंद्रकुमार चव्हाण यांच्याकडे आपल्या मोबाईल नंबर सह द्यायची आहेत.सहभागी कवींना सन्मानपत्र देण्यात येणार आहे.याची नोंद घ्यावी.काव्यवाचन मैफल सकाळी १०•३० वा.कार्यक्रम स्थळ-समाजमंदिर कसवण (ग्रामपंचायत कसवण तळवडे कार्यालय जवळ)ता.कणकवली जि.सिंधुदुर्ग येथे संपन्न होणार आहे.
अशी माहिती नक्षञाचं देणं काव्यमंच सिंधुदुर्ग अध्यक्ष कविवर्य उदय सर्पे यांनी कळविली आहे.