स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या यात्रेला सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजप शिंदे गटाकडुन जोरदार शक्ती प्रदर्शन

सावंतवाडी प्रतिनिधि

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव करण्यासाठी भाजप आणि शिंदे गट यांच्या माध्यमातून सावंतवाडीत आज काढण्यात आलेल्या गौरव यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात विधानसभा मतदार संघातील नागरिकांसह विविध हिंदू संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी शिंदे गटाकडुन जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी “स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो “भारत माता की जय”वंदे मातरम अशा घोषणा देत ही रॅली शहरात फिरविण्यात आली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली व शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या नेतृत्वाखाली हे रॅली सावंतवाडीत काढण्यात आली होती. या रॅली ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी भाजपचे पदाधिकारी तसेच शिंदे गटाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक दळवी ,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी तसेच भाजप व शिंदे गटाचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने या रॅली सहभागी झाले होते

error: Content is protected !!